
नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात (Modi Government) अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली आहे.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला अविश्वास ठराव लोकसभा अध्यक्षांनी मंजूर केला आहे. या अविश्वास प्रस्तावावर चर्चेची वेळ आणि तारीख नंतर निश्चित केली जाईल, असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले आहे. अविश्वास प्रस्ताव स्वीकारताना ओम बिर्ला म्हणाले की, "अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे. चर्चेनंतर प्रस्ताव कधी मांडायचा याची तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल."
मोदी सरकारविरोधात २०१८ नंतर आलेला हा दुसरा अविश्वास ठराव आहे. अविश्वास ठराव मंजूर झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. परंतु आताची परिस्थिती पाहता भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. ३२३ खासदारांचा पाठिंबा एनडीएकडे असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेला कोणताही धोका नाही. त्यामुळे हा प्रतिकात्मकदृष्ट्या अविश्वास ठराव आहे.