Wednesday, April 30, 2025

कोकणताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या हस्ते संगणक वाटप

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या हस्ते संगणक वाटप

कणकवली: सिंधुदूर्गातील दुर्गम खेड्यातील मुटाट अंगणवाडी (घाडीवाडी देवगड) व नडगिवे-खारेपाटण शाळा क्र.१ (वैभववाडी) या शाळेत आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले.

तसेच भाजपा ओबीसी मोर्चा व दक्षिण मुंबई भाजपा अध्यक्ष विजय घरत यांच्या मार्गदर्शनाखाली १ ली ते ७ वीतील श्रीराम माध्यमिक विद्या मंदीर (पडेल देवगड) येथील ४ शाळांना, कणकवलीतील वागदे, बोर्डवे येथील नाथपंथीय गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ संचालित अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जम्बोबुक वह्या, ड्राईंगच्या वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी देवगड पडेल सरपंच संदिप पोकळे, कणकवली माजी उपसभापती मिलिंद मिस्त्री, वागदे सरपंच संदिप सावंत, माजी सरपंच, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, ग्राम पंचायत सदस्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, बाबु आडिवरेकर, बाबु घाडिगावकर व बंधु रंजित घाडिगावकर उपस्थित होते.

Comments
Add Comment