आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी
मुंबई ( प्रतिनिधी ): कोकणात अगदी लहान वाडी,वस्त्या आणि तांडे आहेत. त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांना सर्व सुविधा पोहचविण्यासाठी लोकसंख्येच्या निकषाची अट दूर करा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली.
कोकणातील वाडी वस्त्या आणि तांड्यात धनगरांचे ५० ते ६० कुटुंब राहतात. दलित वस्तीच्या लोकसंख्येचा आधार घेतल्यास या लोकांपर्यंत शासनाच्या आवश्यक त्या सुविधा पोहचत नाहीत. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषाची अट तात्काळ दूर करून या लोकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
त्यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी लोकसंख्येच्या निकषाची अट दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.