Wednesday, April 30, 2025

ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही वाहनांची तोडफोड

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही वाहनांची तोडफोड

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संवेदनशील, उपायुक्त मोनिका राऊत यांना आव्हान

नाशिकरोड : सोमवारी पहाटे विहीतगाव येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारे यांची उचलबांगडी केली होती. मात्र विहितगावच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा धोंगडे नगर परिसरात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक रोड परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

राजलक्ष्मी हॉल, धोंगडे नगर या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी कोयते व तलवारीच्या सहाय्याने चार गाड्यांचा काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

नाशिक रोड परिसरात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या तोडफोडीच्या घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे.

पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देताना दिसत आहे.

धोंगडे नगर येथील तोडफोडीच्या घटनेसंदर्भात येथील अतुल धोंगडे यांनी संशयित आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आरोपींनी तोंडाला काळे कापड बांधले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. दुचाकी वरून हे आरोपी पसार झाले.

दरम्यान परिमंडळ दोनच्या नवनियुक्त उपायुक्त मोनिका राऊत यांच्यापुढे नाशिक रोड परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment