मुंबई : मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पूर, दरड कोसळल्याची घटना समोर येत आहे. रायगड जिल्ह्याच्या इर्शाळवाडी (Irshalwadi) दरड दुर्घटना, आणि काल रात्री मुंबई पुणे एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना आता मुंबईतील (MumbaI) अंधेरी पूर्व चकाला (Chakala) परिसरात रामबाग सोसायटीत दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्व झोपेत असताना ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेला डोंगरामधून सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या दगड-मातीचा ढिगारा आला. यामुळे परिसरात मध्यरात्रीच गोंधळ सुरु झाला. या दुर्घटनेमुळे सर्वांची झोप उडाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेले नाही. परंतू इमारतीमधील फ्लॅटचे नुकसान झाले आहे. पाच ते सहा घरांचे संसार उध्दवस्त झाले आहेत.
पोलीस, अग्निशमन दल आणि पालिकेच्या पथकासह याठीकाणी मदत व बचावकार्य सुरु आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra