Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीNashik : निफाड तालुक्यात युरियाचा काळाबाजार उघड

Nashik : निफाड तालुक्यात युरियाचा काळाबाजार उघड

लाखोंचा युरिया मुंबईला काळ्याबाजारात जाणारा ट्रक निफाड तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला

नाशिक : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निफाडला रात्री एक वाजेच्या सुमारास काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा युरियाचा ट्रक पकडून काळाबाजार करणारी टोळी उध्वस्त केली आहे.

लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवस फाटा नांदगाव रोडवर एका वस्तीवर केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उरवरक परी योजना शिक्का असलेल्या एका गोणीतून दुसऱ्या खाजगी गोणीत भरून एमएच १८ बीएच १७८६ या ट्रकने हा माल मुंबईकडे नेला जात होता.

काळ्याबाजार भावांप्रमाणे २० लाख रुपयांच्या ४०० ते ५०० युरियाच्या गोण्या भरून ही गाडी मुंबईत एका कंपनीत जात असताना निफाडला हा युरियाचा भरलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. एक संशयितासह ड्रायव्हर क्लीनर पोलिसांच्या ताब्यात आहेत. या गाडीत तब्बल ५०० गोण्या असल्याने मुद्देमालाची खातरजमा करून अजूनही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान गोडाऊन मधून फाडून रिकाम्या केलेल्या शासकीय गोण्याही एलसीबी पथकाने जप्त केल्या आहेत.

शेतकऱ्यांना स्वस्तात मुलबक युरिया मिळावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उरवरक परी योजना चालू केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी २८० रुपयांना मिळते. शेतकऱ्यांना युरिया मुबलक मिळत नाही व घ्यायचा असल्यास आधारकार्ड लिंक करून युरिया घ्यावा लागतो. तर कृषी परवानाधारक दुकानदार युरिया माफियाला गोणी २ हजार रुपयाला विकतात. तर युरिया माफिया ही गोणी मुंबईत कंपनीला ५००० हजार रुपयांना विक्री करतो, असे समजते.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -