पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे अनेक वरीष्ठ नेते आणि पदाधिकारी पुण्यात दाखल आले आहेत. या सर्वांनी मदनदास देवी यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरिद्वारच्या पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म व इतर उपचारही करण्यात आले होते.
मदनदास देवींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले. आयुष्यातील जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपपर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra