
थ्रेड्सला द्यायची आहे टक्कर...
नुकतंच मेटाने एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देणारं थ्रेड्स हे ॲप आणलं होतं. त्यानंतर ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) अनेक नवनवीन फीटर्स ट्विटरमध्ये आणत आहेत. मात्र काही दिवसांपासून एलॉन मस्क ट्विटरचा लोगो बदलणार, अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून ट्विटरचा लोगो बदलण्यात आला आहे. यापुढे ट्विटरसाठी निळ्या रंगाच्या 'चिमणी'चा लोगो (Blue bird) दिसणार नसून 'X' या इंग्रजी आद्याक्षरासारखा दिसणारा एक लोगो (White X on a black background) असेल. एलॉन मस्क आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांनी आज सोशल मीडिया नेटवर्कसाठी नवीन लोगोचे अनावरण केले.
There’s absolutely no limit to this transformation. X will be the platform that can deliver, well….everything. @elonmusk and I are looking forward to working with our teams and every single one of our partners to bring X to the world.
— Linda Yaccarino (@lindayacc) July 23, 2023
ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून, लवकरच आपण ट्विटर ब्रँडला अलविदा करू. ट्विटरसोबतच हळू हळू सर्वच पक्ष्यांना आपण उडवून लावू, अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं होतं. मस्कच्या घोषणेला प्रतिसाद म्हणून, कंपनीने काही तासांतच http://X.com वरून https://twitter.com/ वर पुनर्निर्देशित करत त्वरेने कारवाई केली. ट्विटरचा नवा लोगो देखील ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात दिसला. सीईओ लिंडा याकारिनो यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यालयाचा फोटो शेअर केला आहे.
It’s an exceptionally rare thing – in life or in business – that you get a second chance to make another big impression. Twitter made one massive impression and changed the way we communicate. Now, X will go further, transforming the global town square.
— Linda Yaccarino (@lindayacc) July 23, 2023
एलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपला प्रोफाईल फोटोही नवीन लोगोसह बदलला आहे. त्याने असेही सूचित केले की डिझाइन बदलले जाईल. मस्कने त्याच्या १४९ दशलक्ष फॉलोअर्सना डिझाईनच्या कल्पनांसाठी आवाहन केले होते आणि त्याने रविवारी त्याच्या ट्विटर फीडच्या शीर्षस्थानी पिन केलेल्या फ्लिकरिंग व्हिडिओद्वारे आताचा नवा लोगो निवडला होता.
WeChat या चिनी ॲपवर तयार केलेली संकल्पना
X ही संकल्पना वुई चॅट (WeChat) या चिनी ॲपवर (China app) तयार केली आहे जी वापरकर्त्यांना मेसेजिंगपासून टॅक्सी ऑर्डर करणे आणि बिले भरण्यापर्यंत अनेक कार्ये करू देते. गेल्या वर्षी जूनमध्ये, मस्कने कथितपणे ट्विटर कर्मचार्यांना सांगितले: “तुम्ही मुळात चीनमध्ये WeChat वर राहतात. जर आम्ही ते Twitter सह पुन्हा तयार करू शकलो, तर आम्ही खूप यशस्वी होऊ.” त्यानुसार आता ट्विटरवरील नवीन बदलांमुळे यूजर्सना पहिल्यांदाच अनेक नवीन गोष्टी करण्याची संधी मिळणार आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग व्यतिरिक्त बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंट सारखे काम देखील केले जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कंपनी ट्विटर म्हणजेच X मध्ये सुधारणा करेल. न्स्टाग्रामच्या नवीन ॲप थ्रेड्ससोबत ही स्पर्धा असणार आहे.