Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीNashik crime: भयंकर! चक्क कोयता मिरवत वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड

Nashik crime: भयंकर! चक्क कोयता मिरवत वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड

नाशिक: नाशिक (Nashik) शहरातील सुरक्षिततेवर एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री विहितगाव (Vihitgaon) परिसरात युवकांनी चक्क कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे.

नाशिक शहरातील उपनगर परिसरातील रामकृष्ण हाऊसिंग सोसायटी विहित गाव येथील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि रस्त्यालगत उभे असलेल्या मालवाहू टेम्पो आणि काही चार चाकी गाड्यांचे या समाजकंटकांनी नुकसान केले आहे. गाड्यांची तोडफोड करत दुचाकी जाळत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संतप्त नागरिकांनी पोलिसांवरती रोष व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोबतच रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन संशयित वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.

दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन हे वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.

घटनेचा संपूर्ण व्हिडिओ:

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -