
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) मुंबईकडे येणारी वाहतूक आज दुपारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी येथे बोगद्याजवळ दरड कोसळल्याने दगड आणि माती महामार्गावर आली होती. त्यामुळे या मार्गावरून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, ही दगड आणि माती हटवण्यासाठी आज दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात दुपारी १२ ते २ या वेळेत पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या काळात पर्यायी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येणार आहे.