पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai – Pune Expressway) आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली होती. दगडमातीचा ढिगारा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला होता. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. आता तीनपैकी दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. एक लेन अजुनही बंद आहे.
एक लेन बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावरील लगदा रात्री अडीच वाजेपर्यंत हटवण्यात आला होता. त्यामुळे दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र वाहतूक धिम्म्या गतीने सुरू आहे. अजुनही आडोशी बोगद्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांची अडचण झाली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra