Friday, August 22, 2025

'माझी जन्मठेप' म्हणजे राष्ट्रभक्तीची प्रेरणा! आ. नितेश राणे यांच्याकडून भेट स्वीकारताना आनंद

'माझी जन्मठेप' म्हणजे राष्ट्रभक्तीची प्रेरणा! आ. नितेश राणे यांच्याकडून भेट स्वीकारताना आनंद

मुंबई: 'माझी जन्मठेप' हे केवळ पुस्तक नसून स्वातंत्र्यसूर्य सावरकरांच्या संघर्षाची आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा आहे, अशी भेट मिळाल्याचा आनंद झाला, असे उद्गार आमदार रवींद्र चव्हाण यांनी काढले. आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांच्या मार्गदर्शानाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात 'लोकसभा प्रवास योजना' या विषयावर आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'माझी जन्मठेप' हे पुस्तक आमदार रविंद्र चव्हाण यांना भेट म्हणून दिले.

या बैठकीस उपस्थित राहून कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करून, पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार गणपत गायकवाड, लोकसभा प्रवास योजना अभियानाचे प्रदेश संयोजक संजय भेगडे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment