
मुंबई : अंधेरी पूर्वेकडील स्टेशन परिसरात पहाटे साडेचारच्या सुमारास कपोल बँकेमध्ये भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन अर्धा तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत कपोल बँक संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास अंधेरी पोलीस करत आहेत.
शहरातील उच्चभ्रू परिसरातील बँकेत आग लागल्याची घटना घडल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. आगीत बँकेतील फर्निचर आणि काही कोटींची रक्कम जळून खाक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.