Saturday, July 13, 2024
Homeमहत्वाची बातमीझालाच तर....अजित पवार मुख्यमंत्री होण्यावर फडणवीसांची थेट प्रतिक्रिया!

झालाच तर….अजित पवार मुख्यमंत्री होण्यावर फडणवीसांची थेट प्रतिक्रिया!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होतील असे विधान केले होते. तसेच अमोल मिटकरी व राष्ट्रवादीचे मंत्री अनील पाटील यांच्याकडूनही अशाच प्रकारची वक्तव्ये केली जात होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी “कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाही. राष्ट्रवादीतील लोकांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही. झालाच तर मंत्रिमंडळ विस्तार होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी स्पष्ट केले होते

या संदर्भात अजित पवार आणि मी, आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची पूर्ण चर्चा झाली त्यावेळेसही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही, असंही फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -