
पण अमित ठाकरे म्हणतात...
सिन्नर : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) सिन्नर येथील टोलनाका तोडफोडप्रकरणी पंधरा मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील आठ जणांना वावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर टोलनाक्यावर तोडफोड केली होती. समृद्धी टोल प्रशासनाने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.
या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः अमित ठाकरे यांनी टोल व्यवस्थापनाला दोषी ठरवत कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थनच केले आहे. तेथील मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषेत बोलले असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे.
या कार्यकर्त्यांना केली अटक :
- स्वप्निल संजय पाटोळे (२८, रा. अभियंता नगर कामटवाडे शिवार, नाशिक )
- ललित नरेश वाघ ( २८, रा.पवन नगर, नवीन नाशिक)
- शुभम सिद्धार्थ थोरात ( २७, रा. दत्त चौक मार्केट मागे, नवीन नाशिक)
- मेघराज शाम नवले (२९, रा. पाथर्डी फाटा, नाशिक)
- शशिकांत शालिग्राम चौधरी ( ३५, रा. कलानगर जेलरोड, नाशिकरोड)
- बाजीराव बाळासाहेब मते (३४, रा. देवळाली गाव, नाशिक रोड)
- प्रतीक माधव राजगुरू (२३, रा. सावता नगर नवीन नाशिक)
- शैलेश नारायण शेलार (३१, रा. खेरवाडी, ता. निफाड)