Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीPune crime: खळबळजनक! पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून आत्महत्या

Pune crime: खळबळजनक! पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून आत्महत्या

पूणे: पुण्यात एक खळबजनक घटना (Pune Crime) घडली आहे. पुण्यातील बाणेर मध्ये एसीपी भारत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या (Murder) करुन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ते अमरावती पोलीस (Amravati Police) दलात कार्यरत होते.

त्यांच्या पत्नीचे नाव मोनी भारत गायकवाड (वय-४४) तर पुतण्याचे नाव दीपक गायकवाड (वय ३५) आहे. दोघांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

दरम्यान, भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -