मुंबई: मुंबईत पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या फोनमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला घेऊन जात असल्याचे यात म्हटले आहे.
काल मध्यरात्री हा फोन आला असून फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव पांडे असल्याचं समोर आलं आहे. या कॉलचं लोकेशनही मुंबई परिसरातीलच आहे. मुंबई पोलिसांनी या फोनची गांभीर्यानं दखल घेतली असून महाराष्ट्र एटीएस आणि गोवा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस कंट्रोल रूमला फोन करणारी व्यक्ती पोलिसांच्या संपर्कात आहे, पोलिसांकडून आता या व्यक्तीला मिळालेल्या माहितीचा स्त्रोत काय आहे, याची तपासणी सुरू आहे.