Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीPoliticians Childhood Memories : ...म्हणून अजित पवार लहानपणी मोठ्या बहिणीच्या डोक्याला डोकं...

Politicians Childhood Memories : …म्हणून अजित पवार लहानपणी मोठ्या बहिणीच्या डोक्याला डोकं लावायचे!

अजित पवारांची लहानपणीची ‘ही’ करामत ऐकून खळखळून हसाल…

मुंबई : राजकारणात सत्तांतर, वार-पलटवार अशी खेळी करणारी डोकेबाज मंडळी त्यांच्या लहानपणी कशी असतील बरं? अशाच एका नेत्याने आपल्या लहानपणीचा किस्सा उलगडून सांगितला आहे. त्यांची करामत ऐकून तर तुम्हीदेखील खळखळून हसाल. हे नेते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar). ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे (Vijay Chormore) यांनी घेतलेल्या मुलाखतीतून अजित पवारांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून अनेक समीकरणे बदलली आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. गेल्या काही वर्षात अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. असं असलं तरी लहानपणी अजित पवार अभ्यासात विशेष हुशार नव्हते. त्यामुळे आपली बुद्धी वाढावी म्हणून ते एक गोष्ट करायचे. याबाबतची आठवण अजित पवारांनी स्वत: सांगितली आहे.

अजित पवार म्हणाले, “आमच्या घरात आमची मोठी बहीण रज्जो आक्का अतिशय हुशार होती. ती डॉक्टर झाली. सर्वात थोरले काका वसंतराव पवार यांची ती मुलगी आहे. माझी मोठी बहीण विजया पाटील तीही अतिशय हुशार होती. विजया लहानपणापासून मेरीटमध्ये असायची. त्यामुळे आम्ही कधी-कधी लहानपणी झोपल्यानंतर तिच्या (विजया पाटील) नकळत तिच्या डोक्याला डोकं लावायचो. मला धाकटी बहीण विचारायची दादा असं कशाला करतो? मी म्हणायचो तिची बुद्धी आपल्या डोक्यात येऊ दे, डोक्याला डोकं लागलं तर काहीतरी डोक्यात येईल. इथपर्यंतचा फालतूपणा आम्ही केला आहे,” अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.

अजितदादा बारावी पास

आपल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अजित पवारांनी पुढे सांगितलं, “मी ‘बी कॉम’ची पदवी पूर्ण केली नाही. माझं एक सत्र अपूर्ण राहिलं. निवडणुकीच्या अर्जात एस.वाय. बीकॉम असं लिहिता येत नाही. त्यामुळे मला बारावी पास असंच लिहावं लागतं. माझा निवडणुकीचा फॉर्म भरताना मी ‘बी कॉम’ असं कधीच लिहित नाही.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -