नागपूर : सध्या ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार (Online Gaming Fruad) वाढले आहेत. काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला होता. त्यातच आता नागपूरच्या (Nagpur) इतिहासात ऑनलाईन फसवणुकीची सर्वात मोठी घटना समोर आली आहे. एका व्यापाऱ्याची तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक करुन आरोपी फरार झाला आहे. या आरोपीचं नाव अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन (Anant Jain) असून तो गोंदियातील (Gondia) आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी अनंत जैनच्या गोंदियातील घरी छापा घातल्यानंतर कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. या ऑनलाईन फसवणुकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अनंत जैनच्या घरातून आतापर्यंत जवळपास १७ कोटी रुपयांची रोख रक्कम, १४ किलो सोनं आणि २०० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा क्रिकेट सट्टेबाज आहे. या प्रकरणात तक्रारदार व्यापारी व्यवसायाच्या निमित्ताने आरोपीच्या संपर्कात आला होता. या परिचयातूनच आरोपीने तक्रारदाराला ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याचे सांगितले. आधी व्यापाऱ्याने नकार देऊनही आरोपीने त्याला पैशांचे आमिष दाखवले. त्याच्या आग्रहामुळे तक्रारदार व्यापारी तयार झाला. आरोपीने व्यापाऱ्याला ‘डायमंड एक्सचेंज डॉट कॉम’ या लिंक पाठवून त्याचं लॉगिन आणि पासवर्ड तयार करुन ऑनलाईन बेटिंग सुरु केले. नोव्हेंबर २०२१ पासून ही फसवणूक सुरु होती.
आरोपीने व्यावसायिकाला ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली. तक्रारदार व्यापारीला खात्यात ८ लाख रुपये जमा झाल्याचे आढळले आणि तो जुगार खेळू लागला. सुरुवातीच्या यशानंतर, व्यापाऱ्याच्या नशिबात मोठी घसरण झाली कारण त्याने ५८ कोटी गमावले आणि फक्त ५ कोटी जिंकले. अनंत हा सतत जिंकत असल्याने आणि आपण सतत तोट्यात असल्याने व्यापाऱ्याला संशय आला. त्याचे पैसे परत मागितले, परंतु आरोपीने नकार दिला. याशिवाय त्याला कुठे वाच्यता केल्यास अपहरण करुन मारण्याचीही धमकी दिली. त्यातून त्याने उर्वरित चाळीस लाख रुपयेही अनंतला दिले.
यानंतर व्यापाऱ्याने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामुळे भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर नागपूर गुन्हे शाखा आणि गोंदिया गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या गोदिंयातील घरी धाड टाकली असता, कोटयवधींची रोकड आढळून आली मात्र आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून नागपूरमधील ऑनलाईन माध्यमातून झालेली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी फसवणूक आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…