भांडुप (वार्ताहर) : भांडुपमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाच्या उपशाखाप्रमुख, गटप्रमुखपदासह महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील, महिला विभाग प्रमुख राजश्री राजन मांदविलकर, भांडुप विधानसभा संघटक नेहा नंदकुमार पाटकर, उपविभागप्रमुख अंजली अजय घाडीगावकर, संजय दुडे, प्रभाग क्रमांक ११४ चे शाखाप्रमुख संजय शिंदे व महिला शाखाप्रमुख अस्मिता सुहास सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपदा सुर्वे, शितल कदम ,समीक्षा सुद्रिक, सुलोचना कोकाटे, सुचिता घाडीगावकर, प्रतीक्षा बाणे, अर्पिता चिंदरकर, रुपाली जावकर, संपदा मुद्गुल, सुचिता घाडी सेजल परब, प्रणाली सावंत, सारिका चव्हाण, रजनी सावंत, सुचित्रा कदम या महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.