Union Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांचा समावेश ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अपेक्षित असतानाच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात (Central Government Reshuffle) खांदेपालट होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. या चर्चेत केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांचा समावेश करण्याचे निश्चित झाल्याचे कळते.


एका वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट होणे अपेक्षित आहेत. यात काही जणांना घरी बसवले जाण्याची शक्यता असून काही जणांची खाती बदलली जाणार आहेत. या प्रक्रियेत शिवसेनेच्या एका कॅबिनेट तर एका राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळात घेतले जाईल, असे बोलले जाते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली. रात्री त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर या सर्व हालचालींना वेग आल्याचे बोलले जाते.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट