Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

Nashik Hoardings: नाशिकमध्ये ‘गुलशनबाद’चे फलक झळकल्याने तणाव! दादा भूसेंचा कडक इशारा

Nashik Hoardings: नाशिकमध्ये ‘गुलशनबाद’चे फलक झळकल्याने तणाव! दादा भूसेंचा कडक इशारा

नाशिक: शहरात बकरी ईदनिमित्त (Bakri Eid) शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी या फलकांवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद असे नाव लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.



होर्डिंगबाबत दादा भुसे म्हणाले...


पालकमंत्री दादा भुसे आज नाशिक शहरात दाखल होते. यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दादा भुसे म्हणाले की, "माझ्याही कानावर ही बाब आली असून पोलिसांशी बोलणार आहे. ही खोडसाळ प्रवृत्ती असून अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ही ते म्हणाले आहेत.



चौकशी सुरु असल्याने ठाकरे गटाकडून मोर्चा : दादा भुसे


तसेच १ जुलै रोजी ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर दादा म्हणाले की, "ठाकरे गटातील अनेक नेत्यांच्या पाठीमागील काळातील गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात येत आहे. अनेकांच्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असल्याने मोर्चा काढला जात आहे."

Comments
Add Comment