Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीPAN-Aadhaar link : पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले का? आज शेवटचा...

PAN-Aadhaar link : पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले का? आज शेवटचा दिवस

मुंबई : पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. तुम्ही जर अद्याप हे दोन्ही डॉक्यूमेंट्स लिंक केले नसतील तर ते काम आजच करा. आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड आधार कार्डला लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड कायमचे (Inactive PAN) बंद होईल.

आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इनकम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN-Aadhaar link) लिंकिंग सक्तीचे केले आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे. यासाठी अखेरची तारीख ३१ मार्च २०२२ ठेवण्यात आली होती. नंतर वाढून ३१ मार्च २०२३ करण्यात आली होती. यानंतर पुन्हा यात वाढ करून ३० जून २०२३ करण्यात आली. आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही हे काम अद्याप केले नसेल तर आजच करा अन्यथा तुमचे पॅनकार्ड कायमचे (Inactive PAN) बंद होईल.

या स्टेप्स फॉलो करा

  • सर्वात आधी https://eportal.incometax.gov.in/ वर जा.
  • क्विक लिंक्स सेक्शनमध्ये आधारवर क्लिक करा.
  • पॅन आणि आधार नंबर एन्टर करून व्हॅलिडिटी करा.
  • ओटीपीवरून व्हेरिफाय करून इन्कम टॅक्सवर क्लिक करा.
  • AY 2023-24 ची निवड करा. टाइप ऑफ पेमेंट मध्ये अदरची निवड करून कंटिन्यू वर क्लिक करा.
  • १ हजार रुपयाची अमाउंट अदर बॉक्स मध्ये आधीच भरली जाईल. कंटिन्यूवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर, मोड ऑफ पेमेंटला सिलेक्ट करा. हे तुम्हाला सिलेक्ट करण्यात आलेल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाईल.
  • पेमेंट करा.

कोणत्या बँकेतून पेमेंट केली जाऊ शकेल

अॅक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनेरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी यूनियन बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंड्सइंड बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, या बँकाचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -