Thursday, July 4, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यPersonal loans : वैयक्तिक कर्जास अनेक पर्याय...

Personal loans : वैयक्तिक कर्जास अनेक पर्याय…

  • उदय पिंगळे : मुंबई ग्राहक पंचायत

वैयक्तिक कर्जे ही सर्वसाधारणपणे, विनातारण असतात. बँका, पतसंस्था अथवा नॉन बँकिंग कंपन्या यांच्याकडून ते आपल्याला मिळू शकते. तातडीच्या अडचणींवर जसे की आजारपण, शिक्षण, लग्नाचा खर्च, घराचे नूतनीकरण, स्थावर मालमत्ता खरेदी, परदेश प्रवास इ. अशा तत्कालिक मोठ्या खर्चावर मात करण्यासाठी अशी कर्जे घेतली जातात. तर काही जण असे कर्ज सुलभतेने मिळते आहे असे समजल्यावर, ते मुद्दाम घेऊन आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठीसुद्धा घेतात.

वैयक्तिक कर्जामुळे आपली तत्कालीन गरज झटपट पूर्ण होते. सध्या खासगी क्षेत्रांतील बँका म्हणजे एचडीएफसी बँक, अक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स, श्रीराम ग्रुप यांनी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक कर्ज व्यवसायावर ताबा मिळवलेला आहे. याशिवाय झटपट कर्ज देणाऱ्या अनेक मान्यताप्राप्त आणि मान्यता नसलेल्याही अनेक संस्था या बाजारात कार्यरत आहेत.

असे कर्ज घेणे ही अनेकांची अपरिहार्यता असते. तरीही अनेक लोक असे आहेत की, जे आपले पैसे मुदत ठेवीत कमी व्याजाने ठेवून अधिक व्याजदर असलेले अनावश्यक कर्ज उचलतात. यामुळे आपण आर्थिक नव्हे तर वैचारिकदृष्ट्या मागासलेले आहोत हेच सिद्ध होते. ते झटपट मिळत असले तरी याचा व्याजदर अधिक असतो. त्याहून कमी व्याजदराने आपण पुढील मार्गाने कर्ज मिळवू शकतो.

मित्र नातेवाईक यांच्याकडून पैसे उधार घेऊन, असलेली गुंतवणूक मोडून, असलेले सोने-नाणे विकून, पीपीएफ, पीएफमधून अंशतः पैसे काढून घेऊन.यात व्याज देण्याचा प्रश्न येत नाही आणि गरज तत्काळ पूर्ण होते. असे करण्यास संकोच किंवा कमीपणाचे वाटत असेल, थोडेफार व्याज गेले तरी चालेल अशी विचारसरणी असेल तर खऱ्याखुऱ्या गरजेसाठी काही पर्याय आहेत. ते असे:

  • मुदत ठेवींवरील कर्ज – आपली मुदत ठेव असलेल्या संस्थेकडून आपल्यास कर्ज मिळू शकते. हे कर्ज ठेव रकमेच्या ७० ते ९० % असते. तसेच त्यावरील व्याजदर ठेव दराहून १ ते ३% अधिक असतो.
    फायदे : मालमत्ता न मोडता झटपट कर्ज, व्याजदर परवडणारा, कमीतकमी कागदपत्रे, प्रक्रिया शुल्क नाही.
    तोटे : कर्ज रक्कम आणि परतफेड मुदत ठेवींच्या प्रमाणातच, क्रेडिट कार्ड .
  • हे एक अल्पमुदतीचे कर्जच आहे. कमी कालावधीसाठी काही रक्कम खर्चास उपलब्ध होते. काही संस्था ६ महिने मुदतीचे बिनव्याजी कर्ज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
    फायदे : कमी कालावधीची गरज पूर्ण होते, शून्य व्याजदर, खर्च करण्याची पत वाढते, नियमितता असल्यास सीबील स्कोर वाढतो.
    तोटे : परतफेड न करता आल्यास त्यावर दंड आणि व्याज यामुळे कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता, त्यामुळे सीबीलवर परिणाम होतो, यात छुपे खर्च बरेच असतात, सुवर्ण
    तारण कर्ज.
  • आता जवळपास सर्व वित्तीय संस्था ह्या कर्ज सहज देतात. त्यासाठी सोन्याचे दागिने, नाणी तारण म्हणून असल्याने हा सुरक्षित कर्जाचा प्रकार म्हणता येईल.
    फायदे – वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत व्याजदर कमी, चांगल्या सीबील स्कोर आणि निश्चित उत्पन्न असण्याची आवश्यक नसते.
    तोटे- परतफेड कालावधी मध्यम जास्तीत जास्त २४ महिने, तारण सोन्याची किंमत ठरवण्याचे निकष वेगळे.
  • विमा पॉलिसीवरील कर्ज. आपल्याकडे असलेल्या अनेक विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकते. पॉलिसी व्हॅल्यू, कालावधी यावर किती कर्ज मिळेल ते ठरवले जाते.
    फायदे – झटपट वितरण, कमी व्याजदर.
    तोटे – या पॉलिसीवर किती कर्ज मिळू शकते ते आपण इन्शुरन्स कंपनीकडे किती रक्कम जमा केली त्यावर अवलंबून असते. त्यामुळे नेमके किती कर्ज मिळू शकेल याची चौकशी करावी लागेल.
  • कर्जफेड न केल्यास पॉलिसी रद्द होण्याची शक्यता त्यामुळे पॉलिसी घेण्यामागील हेतूलाच धक्का पोहोचण्याची पी टू पी प्लॅटफॉर्म –

    कर्ज देणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या अटी-शर्तीनुसार कर्ज मिळू शकते.
    फायदे – कर्ज देणारा आणि घेणारा यांच्यातील एकमतानुसार योग्य अटींवर कर्ज मिळण्याची शक्यता.
    तोटे – ब्रोकरेज अधिक जाते, यातील प्लॅटफॉर्म फारसे विश्वासार्ह नाहीत.

  • शेअर्स तारण ठेवून कर्ज :
    शेअर, कर्जरोखे, युनिट तारण ठेवून कर्ज मिळू शकते हे कर्ज त्याच्या बाजारभावावर अथवा निव्वळ मालमत्ता मूल्यावर अवलंबून असते.
    फायदे – तत्काळ मिळते, व्याजदर कमी, °आपल्या मर्जीनुसार फेडता येते.
    तोटे – गहाण ठेवलेले शेअर्स, रोखे, युनिट त्यावरील बोजा हटवल्या खेरीज विकू शकत नाही, यदाकदाचित भाव खूप खाली आले तर यातील मार्जिन पैसे किंवा अधिक शेअर्स गहाण ठेवून पूर्ण करावे लागते.
  • स्थावर मालमत्ता तारण ठेऊन कर्ज :
    घर, दुकान, फार्म हाऊस, जमीन अशी स्थावर किंवा व्यवसायाची मशिनरी कच्चा माल, तयार माल यासारखी मालमत्ता तारण ठेवून असे कर्ज मिळते.
    फायदे : याचे पात्रता निकष निश्चित आहेत. मालमत्तेच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत ५० ते ७०% रक्कम कर्ज
    मिळू शकते.
    तोटे : कागदपत्रे तयार करण्यात वेळ जातो.
वैयक्तिक कर्जासाठी वरील पर्याय हे स्मार्ट पर्याय होऊ शकतील. शक्यतो कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाठी…
  • खर्चावर नियंत्रण ठेवावे. नियमित बचत गुंतवणूक करावी,
  • प्रवासासाठी शेअरिंग किंवा सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा,
  • घरातील अनावश्यक वस्तूंची विक्री करावी, छोटा मोठा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालावी.
  • येणाऱ्या रकमेचे योग्य नियोजन करावे. यासाठी नियमितपणे जमाखर्च लिहून वेळोवेळी त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यातून मिळालेली शिकवण लक्षात घेऊन योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. यामुळे यदाकदाचित कर्ज घेण्याची वेळ आलीच तर त्यावर आपल्याला नक्कीच मात करता येईल.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -