
कुडाळ व मालवण तालुक्यातील ६४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन संवाद साधणार
कुडाळ : भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी (Nilesh Rane) मोदी @९ अभियान अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ केला असून ते कुडाळ व मालवण तालुक्यातील ६४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन संवाद साधणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या प्रत्येक अभियानात मालवण कुडाळ मतदारसंघ अग्रस्थानी राहिला आहे. मोदी @9 अभियानातही त्याच तत्परतेने आपण सर्वांनी काम करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्ष कार्यकाळातील विविध योजना व विकासात्मक कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून संपर्क अभियान यशस्वीपणे राबवूया. असे आवाहन करत भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण शहर व तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख यांच्या भेटी घेत बूथ अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला.
मोदी @९ अभियान अंतर्गत कुडाळ, मालवण मतदार संघात शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून घरो घरी संपर्क अभियान विधानसभा मतदारसंघात राबविले जात आहे. या अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रभारी असलेले निलेश राणे कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन भेट देत असून या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेतला जात आहे.
कुडाळ तालुक्यातील बाव शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब यांच्या निवासस्थानापासून या दौऱ्याला सुरुवात झाली असून त्या नंतर पावशी, कसाल, ओरोस, हुमरमळा, आवळेगाव, हिर्लोक, वाडोस, माणगाव, आकेरी, साळगाव येथील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देत कुडाळ तालुक्यातील संपर्क दौरा संपन्न झाला.
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान, या अभियांनांतर्गत निलेश राणे यांनी भर पावसात दिवसभर तालुका दौरा केला. निलेश राणे यांच्याप्रमाणेच सर्व कार्यकर्त्यांत मोठा उत्साह होता.
या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, प्रभारी संजू परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मालवण तालुका अभियान प्रमुख आप्पा लुडबे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, दीपक पाटकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, पूजा करलकर, आबा हडकर, बबलू राऊत, राजू परुळेकर, संजय लुडबे, संजीवनी लुडबे, महेश सारंग, दादा नाईक, माजी सभापती मोहन सावंत, माजी सभापती राजन जाधव, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, दीपक नारकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, राजा धुरी, नागेश परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील गणेश कुशे, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, या शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन या अभियानाची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागात वायरी येथे मंदार लुडबे, देवबाग राम चोपडेकर, कुंभारमाठ अशोक चव्हाण, देवली विरेश मांजरेकर, पेंडूर आतिक शेख, वराड राजन माणगावकर, कट्टा महेश वाईरकर या शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांनी माहिती दिली. यावेळी हरेश गावकर, मुन्ना झाड, भाई मांजरेकर, विक्रांत नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, राजू बिडये, नारायण लुडबे, संदेश तळगावकर, संजय नाईक, सुमित सावंत, अमित सावंत, सुरेश चौकेकर, यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी @9 अभियान अंतर्गत भाजपा कुडाळ मालवण विधनसभा प्रमुख निलेश राणे यांनी मालवण येथे शक्ती केंद्र प्रमुख यांच्या घरी भेट दिल्या. (फोटो : अमित खोत, मालवण)