मुंबई : वैविध्यपूर्ण भूमिका, अनोख्या कथा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकते आहे. तिच्या अभिनयाला एक वेगळीच लय आहे हे ती प्रत्येक प्रोजेक्ट मधून दाखवून देते यात शंका नाही. तिच्या अस्सल व्यक्तिरेखा आणि निर्विवाद प्रतिभेसाठी ओळखली जाणारी ही एक बॉलीवूड अभिनेत्री नेहमीच नवनवीन भूमिकांना सहजपणे आपलंसं करून घेते.
View this post on Instagram
अगदीच अल्पावधीत तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून दंगल, बधाई हो, फोटोग्राफ, लुडो आणि पगलाईट यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या प्रभावी कामगिरीने रसिकांची मन जिंकली. कथलमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मनापासून प्रेम दिलं, कौतुक केलं.
भूमिका कुठलीही असो ती नेहमीच तिच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसते दंगलमध्ये सान्याने तिच्या कुस्तीत प्राविण्य मिळवण्यासाठी महिनोंमहिने प्रशिक्षण घेतले आणि तिच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले. पटाखा असो, लव्ह हॉस्टेल असो किंवा कथल असो, ती प्रत्येक पात्रातील बारकावे कॅप्चर करून तिची बोलीभाषा आणि देहबोली परिपूर्ण आत्मसात करून भूमिका साकारते. कथलमध्येही, जिथे तिने पहिल्यांदा पोलिसाची भूमिका केली होती सान्याने तिच्या पात्रा साठी सखोल संशोधन केले आणि पहिल्यांदा पोलिसांची भूमिका साकारली. अभिनयाच्या सोबतीने ती एक उत्तम डान्सर आहे.
सध्याच्या घडीला बॉलीवुड मध्ये सान्याचे काम हे टॉप लिस्ट वर आहे आणि म्हणून ती आगामी प्रोजेक्ट “जवान”ची जोरदार तयारी करताना दिसते ज्यामध्ये ती सुपरस्टार शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याव्यतिरिक्त ती सॅम बहादूर आणि मिसेस सारखे चित्रपट करणार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra