Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणMumbai Goa highway : पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्ग खचला!

Mumbai Goa highway : पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्ग खचला!

रत्नागिरी : पहिल्याच पावसाचा जबरदस्त दणका मुंबई गोवा महामार्गाला बसला आहे. मुंबई गोवा महामार्गाचे गेल्या १०-१२ वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर जागोजागी खड्डे पडतात. वडखळ ते इंदापूर दरम्यान तर अक्षरश: खड्ड्यांची चाळण होते.

अशातच आता पहिल्याच पावसात हातखंबा ते निवळी या दरम्यान मुसळधार पावसाने रस्ता खचला आहे. कालपासून रस्ता खचल्यावर देखील ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर आता यंत्रसामुग्री लावून रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरु असून या मार्गांवरून सद्यस्थितीत एकेरी वाहतूक सुरु आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -