
पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेत (Pune Sadashiv Peth) तरुणीवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर हल्ला करणाऱ्या त्या तरुणाचा जबाब पुढे आला आहे. त्याने जबाबात तरुणीवर हल्ला का केला? याचं कारण सांगितलं आहे.
तरुणीने प्रेमसंबंध संपवल्याने त्या रागातून हल्ला केल्याचा जबाब हल्लेखोराने दिला आहे. शंतनू जाधव, असं हल्लेखोराचं नाव आहे. शंतनूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन तरुणांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्याने हा जबाब नोंदवला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी शंतनुच्या रक्ताच्या काही चाचण्या करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सोबतच त्याच्याकडे असलेला कोयता त्याने कुठून आणला. याचा देखील तपास पोलीस करत आहेत.