लंडन (वृत्तसंस्था) : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ब्रायन लारा (Brian Lara) हे क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज खेळाडू लंडनमध्ये एकत्र फिरत होते. खुद्द सचिनने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोमध्ये कॅरेबियन दिग्गज ब्रायन लारासोबत सचिन लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यादरम्यान दोघेही मस्त स्टाईलमध्ये बोलताना दिसत आहेत. पोस्ट शेअर करताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले, “आज आणखी एका उत्तुंग गोल्फपटूला भेटलो. सध्या ‘मास्टर ब्लास्टर सचिन’ कुटुंबासह परदेशात सुट्टी घालवत आहे.
विशेष म्हणजे सचिन आणि लारा दोघांनाही गोल्फ खेळण्याचे वेड आहे. अलीकडेच सचिनने केनियामध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोल्फर गॅरी प्लेयरची भेट घेतली आणि त्याच्याकडून काही टिप्स घेतल्या. हे दोन्ही खेळाडू क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २४ वर्षांची होती, दुसरीकडे लाराने १७ वर्षे वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधीत्व केले. आपल्या कारकिर्दीत या दोन्ही दिग्गजांनी अनेक विक्रम केले जे आजही कायम आहेत. तसेच या दोन्ही खेळाडूंमधील मैत्री सर्वांनाच माहित आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…