
मुंबई : भायखळा येथील इंदू ऑईल मिल कंपाऊंडमध्ये मध्यरात्री झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. (Indu Oil Mill Compound) मध्यरात्री २.३० वाजता ही दुर्घटना घडली.
जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रेहमान खान (२२) असे आहे.
पावसाने पहाटेपासून मुंबईसह उपनगरात जोर धरला आहे. उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत.