मुंबई: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोमधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेता समीर चौघुले आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. (Samir Choughule birthday) त्यानिमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर समीर चौघुलेंबद्दल एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेता प्रसाद ओक, समीर चौघुले यांच्यासोबत उभी असल्याचे दिसून आली आहे.
प्राजक्ता माळी हिने लिहिले की, दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला. खरचं…, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस. तूझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली. आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले. आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं. तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश, प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो…आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
View this post on Instagram
प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. तर काहींनी समीर चौघुलेला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत येत आहे. एका मुलाखतीमध्ये समीर चौघुलेनं सांगितलं होतं की त्याला अभिनय नाही तर क्रिडा क्षेत्रात करिअर करायचं होतं. तो म्हणाला, ‘मी आधी स्पोर्ट्समन होतो. मी शाळेत असताना खो-खो, कबड्डी टीमचा कॅप्टन होतो.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra