Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

Rain Update: भिवंडीत मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटणार

Rain Update: भिवंडीत मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटणार

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहर तसेच ग्रामीण भागामध्ये तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातून वाहणाऱ्या कामवारी नदी (Kamwari River) पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक गावांमधून पावसाचे पाणी शिरले आहे.

भिवंडी पारोळ मार्गावरील कांबा गावाच्या हद्दीत तलवली नाका येथे रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीक जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. नदीनाका येथील कामवरी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर पाऊस पडल्यास धोका वाढू शकतो. रात्री पावसाचा जोर वाढल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >