Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीसंजय राऊत राष्ट्रवादीची “YZ” टीम!

संजय राऊत राष्ट्रवादीची “YZ” टीम!

आमदार नितेश राणे यांची टीका

कणकवली : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार केला. भ्रष्टाचारी, ४२० असलेला हा संजय राजाराम राऊत प्रेस घेवून ज्ञान पाजळतो. उद्या गुंड दाऊद इब्राहिम, विजय माल्या असे ज्ञान पाजळत असेल तर आम्ही ते सहन करायचे काय? लोकांचे पैसे खावून आमच्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राऊत टीका करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही. केसीआर ही भाजपाची बी टीम म्हणणारे संजय राजाराम राऊत हे राष्ट्रवादी पक्षाची “YZ” टीम आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

‘सामना’ हे राष्ट्रवादीचे मुखपत्र

‘सामना’ हे राष्ट्रवादीचे मुखपत्र झाले आहे. ते शिल्लक सेनेचे राहिलेले नाही. कारण राष्ट्रवादी पक्ष सोडून केसीआर सोबत जे नेते गेले त्याचे दुःख राऊत यांना झाले. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. म्हणून केसीआर यांनी हे केले ते केले अशी टीका ते करत आहेत.

राऊतने स्वत:ची लायकी पहावी

स्वतःचा पक्ष आणि मालक यांना संपवून राऊतने स्वत:ची लायकी पहावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी यादी वाचली त्या यादीत टीका करण्यासाठी सुद्धा तुमच्या मालकाचे नाव घेतले नाही, त्यांच्या यादीत तुमच्या पक्षाची जागा नाही. यातूनच आपली काय लायकी राहिली आहे हे स्पष्ट होते. या यादीत तुझ्या मालकाचे नाव सुद्धा पंतप्रधानांनी घेतले नाही.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मालक संपत चालला आहे. याची थोडी तरी चिंता संजय राजाराम राऊत यांनी करावी, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.

पेंग्विन मोर्चाचा समारोप भायखळाच्या राणीच्या बागेत करा

मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच निघणारा पेंग्विन मोर्चा काढण्यास परवानगी देताना भायखळाच्या राणीच्या बागेत त्याचा समारोप झाला पाहिजे अशी परवानगी द्यावी. कारण पेंग्विनला उष्ण वातावरण चालणार नाही. राणीच्या बागेतील वातावरण थंड असल्याने तिकडे त्या मोर्चाचा समारोप करावा, असा उपरोधिक टोला आमदार नितेश राणे यांनी हाणला आहे.

राऊत यांना जेलच्या अंधार कोठडीत जावेच लागणार

संजय राजाराम राऊत याच्या जामीनावरच ईडी विभागाची हरकत आहे. भाजप शिवसेना युतीचे सरकार पडणार अशी स्वप्ने पाहणारे राऊत यांना आमचे सरकार पाडता आलेले नाही. मात्र यापुढे त्यांना जेलच्या अंधार कोठडीत कविता आणि शायरी म्हणत दिवस काढावे लागतील असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी असल्याने त्याविषयी ते बोलत होते.

खासदार विनायक राऊतांनी खासदार म्हणून केलेली कोणतीही दहा कामे दाखवावित

खासदार विनायक राऊत नेहमी केवळ राणेंवर टीका करतात. त्यांनी स्वतः खासदार म्हणून केलेली कोणतीही दहा कामे दाखवावित. राणे साहेब आणि आमच्यावर टीका करण्यापेक्षा विकासा बद्दल बोलावे, असे नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -