'आदिपुरुष'पेक्षा 'रावरंभा', 'चौक' आणि 'टीडीएम' मराठी चित्रपट 'लय भारी'!

  157

मुंबई : बहुचर्चित 'आदिपुरुष'कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असली तरी 'रावरंभा', 'चौक' आणि 'टीडीएम' या मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असल्याचे चित्र आहे.


ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपट प्रदर्शित होताच दोन दिवसात प्रेक्षकांनी चित्रपटाला नापसंती दर्शवली. पहिल्या दोन दिवसातच 'आदिपुरुष'ची जादू प्रेक्षकांवरून उतरली आणि नेटकऱ्यांनी चित्रपटावर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्ववादी संघटना आणि न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त केली.


चित्रपटामधील कलाकारांच्या क्रेझमुळे पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने प्रचंड कमाई केली. मात्र त्यानंतर प्रेक्षकांनी त्याला जमिनीवर आपटले. सुरुवातीच्या काही दिवसात आगाऊ बुकिंगचा फायदाही या चित्रपटाला झाला. मात्र नंतर परिस्थिती बदलली. काही ठिकाणी तर आदिपुरुषचे शो रद्द करावे लागले.


'आदिपुरुष' चित्रपटाने पहिल्या १२ दिवसात तब्बल २७८ कोटींचा गल्ला जमवला. यापैकी सर्वाधिक कमाई केवळ पहिल्या २ दिवसांची आहे. मात्र त्यानंतर आदिपुरुषच्या कमाईचा वेग मंदावला आणि चित्रपट फ्लॉपच्या यादीत येऊन बसला.


या सगळ्यात मराठी चित्रपटांनी मात्र चांगलीच बाजी मारली असून मराठी चित्रपटांनी आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे.


'रावरंभा' या चित्रपटाने तीन आठवड्यात तब्बल ६ कोटी २५ लाखांचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट मोठया चित्रपटगृहांमधून उतरला असला तरी तो टुरिंग टॉल्किजवार सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


'चौक' या राजकारणावर आधारलेल्या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना चौकातील परिस्थिती दाखवली. या चित्रपटाने नुकताच चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४ कोटी ५५ लाखांची कमाई केली आहे.


तर भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'टीडीएम' बद्दल सांगायचं तर या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही अनेक ठिकाणी 'टीडीएम' आपली जादू चालवतोय. या चित्रपटाने खासकरून ग्रामीण भागातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने एकूण ३ कोटींहुन जास्तीची कमाई केली असल्याचं एका वेबसाइटने म्हटलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रामायण: द इंट्रोडक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरणार का?... नऊ शहरांचं उद्या पहिल्या लूककडे लक्ष..

रामायण हे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाच मानलं जात. रामायणातील विविध कथांचं वाचन आणि अध्ययन करून

कैलाश खेर यांच नवं गाणं..गायकाने दिला मराठीतून स्वच्छतेचा नारा...

दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय