Tuesday, December 3, 2024
HomeदेशPM Modi : समान नागरी कायदा लागू करणार!

PM Modi : समान नागरी कायदा लागू करणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) स्वत: करणार मुस्लीम समुदायाशी चर्चा, सांगणार समान नागरी कायद्याची गरज

भोपाळ : समान नागरी कायदा (Uniform Civil Law) लवकरात लवकर लागू करण्यासाठी मोदी सरकार (Modi Govt) प्रयत्नशील आहे. परंतु मुस्लीम समुदायामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी विरोध तर काहींनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्वत: मुस्लीम समुदायाशी याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी जुलै महिन्यात ‘मोदी मित्र’ संमेलनात मोदी समान नागरी कायद्याबाबत मुस्लिमांमध्ये पसरवण्यात आलेला संभ्रम दूर करतील.

एका घरात दोन कायदे राहू शकत नाहीत, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये स्पष्ट संकेत दिले आहेत की हा कायदा लवकरात लवकर लागू होऊ शकतो. यापूर्वी पंतप्रधानांनी अनेकदा सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने विधाने केली आहेत. कोर्ट वारंवार म्हणत आहे की, समान नागरी कायदा लागू करा, असे त्यांनी म्हटलेले आहे. त्याचबरोबर समान नागरी कायदा लागू करण्याचा मुद्दा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोर अजेंड्यामध्ये समाविष्ट आहे. विधी आयोगानेही सर्व धर्म व सामाजिक संस्थांकडून याबाबत सूचना मागवलेल्या आहेत.

प्रत्येक मतदारसंघात पाच हजार ‘मोदी मित्र’

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मते वाढवण्यासाठी देशातील लोकसभेच्या सर्व ५४३ मतदारसंघांमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यामुळे प्रभावित झालेल्या पाच-पाच हजार मुस्लिमांना ‘मोदी मित्र’ केले जाणार आहे. या ‘मोदी मित्रां’चे संमेलन पुढील महिन्यात दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहे. या संमेलनाला संबोधित करण्याच्या बहाण्याने पंतप्रधान स्वत: मुस्लिमांशी संवाद साधणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -