Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीMP Rahul Shewale : दणका! उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना बदनामीकारक मजकूर...

MP Rahul Shewale : दणका! उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी शिवडी कोर्टाचे समन्स

१४ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी (shivdi magistrate court) न्यायालयाने शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावत १४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्याविरोधात ‘सामना’ या राजकीय मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर न्यायालयाने हे समन्स जारी केले आहेत.

सामना या मुखपत्राच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीमध्ये २९ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित एका लेखात राहुल शेवाळे यांचे दुबई तसेच पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखे यांच्या मार्फत ३ जानेवारी २०२३ रोजी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचे सामनाकडून प्रत्युत्तरात सांगण्यात आले होते.

या उत्तरानंतर शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे.

दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला आहे. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळे यांनी सादर केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -