Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाकेवळ खिचडी खाऊन धोनीने २०११ चा विश्वचषक खेळला : सेहवाग

केवळ खिचडी खाऊन धोनीने २०११ चा विश्वचषक खेळला : सेहवाग

दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ खिचडी खाऊन महेंद्रसिंह धोनीने (Mahendrasingh Dhoni) २०११ चा विश्वचषक (World Cup 2011) खेळला असल्याचा खुलासा भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने केला. एकदिवसीय वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर एका इंग्रजी क्रीडा वाहिनीशी सेहवाग बोलत होता.

सेहवाग म्हणाला की, प्रत्येकाच्या मनात काही ना काही विश्वास होता आणि प्रत्येकजण आपापल्या विश्वासाचे पालन करत होता. धोनीला संपूर्ण विश्वचषकादरम्यान ‘खिचडी’ खाण्यावर विश्वास होता. तो म्हणायचा की मी धावा करत नसलो तरी ही युक्ती काम करत आहे आणि म्हणूनच आपण सामने जिंकत आहोत. त्यामुळे २०११ मध्ये भारताने विश्वचषचक उंचावला.

आयसीसीने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे मंगळवारी वेळापत्रक जाहीर केले. यावेळी भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग एक एक्सपर्ट म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -