Tuesday, July 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजCabinet decision : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवडी नाव्हा शेवा...

Cabinet decision : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवडी नाव्हा शेवा सी लिंकला अटल सेतू नाव

मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय (Cabinet decision) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet Meeting) घेण्यात आला. तसेच, एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी नाव्हा शेवा सी लिंक ला (Sewri–Nhava Sheva Sea Link) अटल सेतू असे नाव दिले जाणार आहे. तसेच राज्यात तब्बल ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केले जाणार आहेत. यासाठी २१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याचा फायदा तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जलसंपदा विभागामार्फत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

 • वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
 • एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव
 • राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, २१० कोटीस मान्यता
 • बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
 • भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
 • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. २ कोटी कार्ड्स वाटणार आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
 • संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेची रक्कम १००० रूपयांवरून १५०० रुपये
 • आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.करोडो कामगारांना लाभ मिळणार
 • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)
 • मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता
 • पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
 • मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड
 • भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
 • मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
 • राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
 • सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
 • बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
 • जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता
 • राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता
 • बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
 • दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार
 • दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
 • देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
 • चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
 • सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
 • गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
 • ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
 • भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
 • मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
 • राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
 • जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता
 • बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
 • पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -