सांगोला : सोशल मीडियावर एका शेतक-याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शेतक-याने चक्क गायीच्या शेणापासून (cow dung) १ कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. त्या बंगल्याचे नाव गोधन निवास असे ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्याने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगोली तालुक्यातील इमडेवाडीत राहणारे शेतकरी प्रकाश नेमाडे यांच्या कर्तृत्ववान गोष्टीची चर्चा सगळीकडे होत आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर जमिन होती. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना या जमिनीत शेती करणे शक्य होत नव्हते. त्यानंतर त्यांनी गायीचे दूध विकण्याचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला त्यांच्याकडे १ गाय होती. गावोगावी जावून दूध विकले. आता तब्बल १५० गायी त्यांच्याकडे आहेत. त्यांनी दुधासोबत गायीचे शेण सुद्धा विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
View this post on Instagram
शेतीमध्ये आता रासायनिक खतांऐवजी लोक सेंद्रिय खतांचा वापर करू लागले आहेत. शिवाय गोबर गॅस प्लांट सुद्धा आहेतच. या नव्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेणाची गरज भासते. अन् ही गरज प्रकाश नेमाडे यांनी ओळखून शेण विकण्याचा त्यांनी नवीन व्यवसाय सुरु केला. आज ते १ कोटीच्या बंगल्याचे मालक आहेत. गावातल्या शेतकऱ्याची ही कमाल तरुणांना प्रेरित करणारी आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra