लासलगाव : लासलगाव-शिरवाडे (वणी) फाट्यावर मोटारसायकल आणि बसच्या भीषण अपघातात (Horrific accident) तीन शिवसैनिकांचा मृत्यू (Three Shivsainik Died) झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली. त्यांच्या पार्थिवावर आज शिरवाडे (वणी) ता.निफाड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान शिवसैनिकांचे अशा प्रकारे निधन झाल्याने निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार युवा सेना निफाड तालुका उपप्रमुख सुभाष माणिकराव निफाडे, निष्ठावंत शिवसैनिक महेश चंद्रकांत निफाडे,नितीन भास्करराव निफाडे यांचे काल रात्री शिरवाडे फाट्यावर बस आणि मोटारसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या घटनेमुळे आज मंगळवारी शिरवाडे वणी गाव व शिरवाडे फाटा बंद ठेवण्यात आला आहे.