
पुणे : पुण्यात (Pune) मागील दोन दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. येथील कॅम्प परिसरातील दुमजली घराचे छत कोसळून स्टॅनली डिसोझा या ५० वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला. तर जेरी डिसोझा या ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील ८३० दस्तुर मेहेर रोड येथील दुमजली घराचे छत काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळले.
त्यावेळी घरामध्ये जेरी डिसोझा आणि स्टॅनली डिसोझा हे दोघेजण होते. त्या घटनेमध्ये स्टॅनली डिसोझा यांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
तर जेरी डिसोझा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.