Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीAccident in Nashik : नाशिकमध्ये अपघात! १ विद्यार्थी जागीच ठार, तर २...

Accident in Nashik : नाशिकमध्ये अपघात! १ विद्यार्थी जागीच ठार, तर २ जखमी

नाशिक : नाशिकमध्ये आज सकाळी सातपूर अंबड लिंक रोडवर क्लास साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती (Accident in Nashik) मृत्यू झाला. तीन विद्यार्थी एकाच मोटरसायकलवरून (एमएच १५ बीडब्ल्यू २३११) क्लासला जात असताना मोटरसायकल दुभाजकाला धडकून झालेल्या या अपघातात सातपूर येथील सार्थक दामू राहणे (वय १६) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर भावेश केले आणि योगेश केले हे दोघे विद्यार्थी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक व त्याचे दोन मित्र असे तिघेजण मोटरसायकल वरून आज सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान क्लाससाठी जात होते. त्यावेळी सातपूर अंबड लिंक रोडवर सार्थक याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातामध्ये सार्थक हा जागीच ठार झाला. तर योगेश व भावेश हे गंभीर रित्या जखमी असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघेही दहावीचे विद्यार्थी आहेत.

सोमवारी सकाळी अशोक स्तंभ येथे १७ वर्षाच्या मुलाचा मोपेड घसरून अपघात झाला होता. त्यामुळे मुलांबरोबर पालकांचा निष्काळजीपणा वारंवार समोर येत आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -