Thursday, March 12, 2026

Vidyavihar Building Collapse : विद्याविहार इमारत दुर्घटनेतील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Vidyavihar Building Collapse : विद्याविहार इमारत दुर्घटनेतील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : मुंबईत पावसामुळे रविवारी (Mumbai Rain) दोन इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये विद्याविहारमधील (Vidyavihar Building Collapse) तीन मजली प्रशांत निवास इमारत दुर्घटनेत कालच दोघांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत.

तर विले पार्ले येथे रविवारी दुपारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये ६५ वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि ७० वर्षीय रोबी मिसाईटा या दोन जणींचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. अनेक ठिकाणी पाणी साचले. विद्याविहारमधील इमारत कोसळली. त्यानंतर तब्बल २० तास एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते २० तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment