भाईंदर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सगणाई नाका, दिल्ली दरबार हॉटेल समोरच्या सिग्नल जवळ रस्त्यावर मुंबईकडून वर्सोवाच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर एका कंटेनरच्या मागच्या बाजूचा भाग रस्त्यावर उलटल्याची घटना आज पहाटे चारच्या सुमारास घडली होती. यामुळे मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचत वाहतूक कोंडी सोडवण्यास सुरवात करत क्रेनच्या मदतीने कंटेनरचा पडलेला भाग रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न सुरु केला. बऱ्याचवेळ प्रयत्न केल्या नंतर वाहतूक पोलिसांना रस्त्यावर पडलेला कंटेनरचा भाग हटवण्यास यश आले.