Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीBhide Guruji: संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, पण फडणवीस म्हणाले....

Bhide Guruji: संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, पण फडणवीस म्हणाले….

पुणे: शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत त्यांनी १५  ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी फाळणी झाली होती, असे धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (State Home Minister Devendra Fadanvis) यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील (Pune) दिघी येथील जाहीर व्याख्यान्यात त्यांनी हे वक्तव्य केले. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते १८९८ ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही,  तोपर्यंत शांत बसायंच नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल,  असे भिडे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

दरम्यान, यावर भारताला राजकीय स्वातंत्र्य १५  ऑगस्ट १९४७  लाच मिळालेले आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे की भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ १५  ऑगस्ट १९४७ भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही,  हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही. तोच आपला स्वातंत्र दिवस आहे,  असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -