मुंबई : आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाणला भेटायला गेले. दिशा सालियानच्या हत्येनंतर काही लोक सुशांत सिंगला भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर काही दिवसातच सुशांत सिंगची हत्या झाली. असेच काही सूरज चव्हाण बाबत घडणार नाही ना? सूरज चव्हाणचा मनसुख किंवा सुशांत सिंग होणार नाही ना, याची काळजी मुंबई पोलिसांनी आणि संबंधित डिपार्टमेंटने घेतली पाहिजे, असे मत भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की, माझा मुद्दा असा आहे की, आदित्य ठाकरे नेमकं सुरजजवळ काय बोलायला गेला? याबद्दल पोलिसांनी चौकशी करायला हवी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे… जे जे त्यांना आडवे आले त्यांना त्यांना त्यांनी संपवले आहे.
संजय राऊतला वॉग्नोर ग्रुपचा इतिहास माहीत तरी आहे काय? थोडी माहिती घेतली असती तर विरोधकांच्या पाटणा बैठकीला वॅग्नोर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती.
पाटण्याला जमलेला वॅग्नर ग्रुप हिटलरच्या विचारांचा आहे, असे संजय राऊतला म्हणायचे आहे का?
संजय राऊत घरफोड्या आहे. वॅग्नर ग्रुपचा लीडर नाझी विचारसरणीचा होता. संजय राऊतला पाटण्यात भेटलेले पण नाझी विचारसरणीचे आहेत असे म्हणायचे आहे का?
संजय राऊतच्या बुद्धीचे कौतुक करतो. स्वतःच्या मालकाचा वाभाडा काढणारा हा कामगार आहे.
उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला. एका कोपऱ्यात मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेला टाकण्यात आले.
मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते आणि अनिल परब आणि लोक शेंबड्या पोरांसारखे मोर्चा काढत आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला येत आहेत असे ऐकले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री पाकिस्तानची भाषा बोलता आहेत. ते निवडून आल्यानंतर पाकिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आला. पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…