Friday, June 20, 2025

Mumbaikar : मुंबईकर बेहाल! काल पावसामुळे तर आज दोन अपघातांमुळे कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल!

Mumbaikar : मुंबईकर बेहाल! काल पावसामुळे तर आज दोन अपघातांमुळे कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल!

तिकडे वाशी पुलावर अपघात तर इकडे मध्य रेल्वेवर पडली मालगाडी बंद


मुंबई : मुंबईत काल पावसामुळे सगळीकडे पाणी साचले होते. तर आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना आपल्या कार्यालयात पोहचण्यासाठी प्रचंड हाल झाले. सकाळी वाशी खाडी पुलावर ट्रेलरचा अपघात झाला आणि इकडे मध्य रेल्वेवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला.


सायन पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चक्काजाम झाले होते. मानखुर्द पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडले आहे. त्यामुळे कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. यामुळे गेल्या पाऊण तासापासून अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.



कल्याणहून इंजिन मागविण्यात आले आणि मालगाडी बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. परंतू यास वेळ लागला तसेच काही लोकल रद्द कराव्या लागल्या. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोठेही नेमके कारण काय याची अनाउन्स न झाल्याने प्रवासी संतापले होते. अनेक रेल्वे स्थानकांवर गर्दी उसळली होती. दरम्यान, या बिघाडाचा परिणाम आज दिवसभर राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment