
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, परिसरात २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले असून भिवंडी मनपाच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे.
अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे तसेच शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे महापालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून नक्की नालेसफाई झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे.