नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Government) सरकारच्या एका निर्णयाने चीनला (China) मोठा धक्का बसला आहे. भारत चीनकडून मोठ्या प्रमाणावर विअरेबल वस्तूंचे पार्ट्स आयात करायचा आणि ते पार्ट एकत्र करुन तयार करणारे भारतातील कारखानेही चीनचेच होते. भारत सरकारने या विअरेबल वस्तूंच्या इम्पोर्टवर २० टक्के बेसिक कस्टम ड्यूटी लावल्याने भारतीय कंपन्यांनी प्रोडक्ट चीनमधून आयात करण्याऐवजी ते देशातच तयार करायला सुरुवात केली. यामुळे चीनमधील कारखान्यांच्या ऑर्डरवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच देशातील हे पार्ट्स असेंबल करणारे चीनचे अनेक कारखाने एकापाठोपाठ एक बंद होत आहेत.
भारतामध्ये गेल्या वर्षात जवळपास ८ हजार कोटी रुपयांच्या विअरेबल वस्तूंची निर्मिती झाली असून इअरबड्स, नेक बँड आणि स्मार्टवॉच यांसारख्या विअरेबल वस्तूंचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. भारतीय ब्रँड्सनी देशातील ७५ टक्के विअरेबल मार्केटवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे.