Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीSantosh Shinde : सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला...

Santosh Shinde : सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे परिवार आत्महत्या प्रकरण

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील तरुण उद्योगपती तथा अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे (Santosh Shinde) यांच्या कुटुंबाच्या आत्महत्येप्रकरणी शिंदे यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेली माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या टीमने दोघांना सोलापुरातून ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून शोधाशोध सुरु आहे. माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि राहुल राऊत पोलिसांच्या ताब्यात असून ते सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये लपून बसले होते.

एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि आणि पोलिस अधिकारी राहुल राऊत यांनी त्रास दिल्याचं सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील उद्योजक संतोष शिंदे यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर शुभदा पाटील आणि राहुल राऊत यांनी पलायन केलं होतं. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या टीमने त्यांना सोलापुरातून ताब्यात घेतलं आहे.

हे पण वाचा : खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याने अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या

शिंदे यांनी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका, पोलिस अधिकारी राहुल राऊत तसेच संतोष शिंदे यांच्याकडून साडेसहा कोटी रुपये घेतलेले पुण्यातील विशाल बाणेकर आणि संकेत पाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भातील फिर्याद संतोष यांचे नातेवाईक शुभम बाबर यांनी दिली. दरम्यान, संतोष शिंदे यांनी ज्या पद्धतीने आयुष्याचा शेवट केला ते पाहून अक्षरशः काळजाचा थरकाप उडाला. मुलाने अशा पद्धतीने शेवट केल्याने त्यांच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -